कॉंगोचे लोकशाही प्रजासत्ताक हा मध्य आफ्रिकेतील एक देश आहे. डी.आर. कॉंगो हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने आफ्रिकेतील तिसरा व जगातील १२व्या क्रमांकाचा देश आहे. १९६० सालापर्यंत डी.आर. कॉंगो ही बेल्जियम देशाची ऐतिहासिक वसाहत होती. ऑक्टोबर १९७१ ते मे १९९७ दरम्या…कॉंगोचे लोकशाही प्रजासत्ताक हा मध्य आफ्रिकेतील एक देश आहे. डी.आर. कॉंगो हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने आफ्रिकेतील तिसरा व जगातील १२व्या क्रमांकाचा देश आहे. १९६० सालापर्यंत डी.आर. कॉंगो ही बेल्जियम देशाची ऐतिहासिक वसाहत होती. ऑक्टोबर १९७१ ते मे १९९७ दरम्यान हा देश झैरे ह्या नावाने ओळखला जात असे. १९९६ ते २००३ दरम्यान डी.आर. कॉंगो ह्या देशात २ युद्धे झाली. ह्या युद्धांमध्ये तब्बल ५४ लाख बळी गेले. ह्या युद्धांमुळे हा देश जवळजवळ पूर्णपणे उध्वस्त झाला आहे.